१७० विद्यार्थ्यांची केली आरोग्य तपासणी
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बाल स्वास्थ्य जामनेर विभागाचे मेडिकलच्या ऑफिसर डॉ. हर्षाली गोसावी यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या १९८ पैकी १७० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आरोग्य तपासणीवेळी आरोग्य सेविका श्रीमती अनिता बडगुजर उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.