४२ महिलांची केली थायरॉईडची तपासणी
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र नांद्रा प्र.लो. तसेच पाणी फाउंडेशन पुरस्कृत श्री स्वामी समर्थ शेतकरी महिला गट यांच्यावतीने कै.डॉ.आधार पाटील यांच्या जयंतीनिमित्त महिलांचे आजार व सीबीसी थायरॉईड, एचबी शुगर बीपी, औषध उपचार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात महिलांचे सीबीसी आणि ४२ महिलांची थायरॉईडची तपासणी करण्यात आली.
शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सीएचओ डॉ. फिरोज शेख, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, लॅब टेक्निशन नेहा कोळी यांनी यशस्वी नियोजन केले होते.
यशस्वीतेसाठी साधना पाटील, शुभांगी पाटील, आशा स्वयंसेविका, गावातील नवल वाघ, दिवाकर पाटील, दीपक पाटील, रघुनाथ शिंदे, माजी उपसरपंच सुपडू कोळी, स्वामी समर्थ शेतकरी महिला गटाच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले.