मारवड महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेला प्रतिसाद

0
14

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’ जळगावद्वारा आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन केले होते. यावर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

महाविद्यालयातील गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. सतीश पारधी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेचे विद्यार्थी ‘जीवनातील महत्त्व’ विषयावर प्रकाश टाकून परीक्षेच्या नियमांविषयी सूचना दिल्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते.

कार्यक्रमात नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम आयोजित राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. सतीश पारधी आणि प्रा. किशोर पाटील यांचाही सत्कार केला. गांधी विचार संस्कार परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धा आणि स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला प्रा.डॉ. दिलीप कदम, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. व्ही. डी.पाटील, प्रा.डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा. किशोर पाटील, प्रा. डॉ. पवन पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. आभार नाजमिन पठाण हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here