छत्रपती शाहू महाराज संस्था, माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा स्तुत्य उपक्रम
साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी :
येथे मजूर, शेतकरी, गरजू नागरिकांना ‘फॅमिली हेल्थ’ कार्डचे सभासद नोंदणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. शिबिराचा २५० सभासदांनी लाभ घेतला. ‘फॅमिली हेल्थ’ कार्डमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलांमध्ये वीस ते पन्नास टक्केपर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे. त्यात ओपीडी, सोनोग्राफी रक्त तपासणी, अति दक्षता उपचार आदी समाविष्ट केले आहे. बऱ्याच दिवसांपासून माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर यांचा आग्रह असल्याने लोहारा येथे शिबिर लावण्यात आल्याचे छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्पाधिकारी आकाश एस.आर.के यांनी सांगितले.
यावेळी विकासाचे चेअरमन प्रभाकर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, छत्रपती शाहू महाराज संस्थेचे फिल्ड ऑफिसर सविता पाटील, मनीषा साळवे, गोकुळ माळी, रामदास क्षीरसागर, पत्रकार दीपक पवार, सुनील क्षीरसागर, नंदू सुर्वे, सुनील चौधरी, संजय कल्याणकर, दिव्यांग एकता संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सतीश सोनार यांच्यासह सर्व माणुसकी ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.