रावेर तालुक्यातील गावागावात धनंजय चौधरी यांच्या यात्रेला प्रतिसाद

0
17

सावखेडा, उटखेडा, भाटखेडात झाला ‘कृतज्ञता संवाद’

साईमत/रावेर/प्रतिनिधी:

राजकारणासोबत समाजकारण सुद्धा झाले पाहिजे, या उद्देशाने युवा नेते धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून त्यांनी सुरु केलेल्या गाठी-भेटीचे सत्र बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा खु., सावखेडा बु., उटखेडा व भाटखेडा अशा चारही गावांपर्यंत पोहचले. युवा नेते धनंजय चौधरी यांच्या ‘कृतज्ञता संवाद’ यात्रेला गावागावत प्रतिसाद मिळत आहे. गावांमध्ये सर्व समाजघटकांना भेटून त्यांनी संवाद साधला.

रावेर विधानसभा मतदारसंघात आ.शिरीषदादा चौधरी यांनी केलेला ‘विकास व भविष्यातील योजना’ यावर प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यासाठी सुरु असलेल्या कृतज्ञता संवाद दौरा प्रारंभी सावखेडा बुद्रुक गावात प्रथम राम मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन जलपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, आज श्रीशेत्र ओंकारेश्वर, तामसवाडी येथून महादेव मंदिर जिनसी- अभोडा जाणाऱ्या कावड यात्रेस धनंजयभाऊ यांनी भेट दिली.

उटखेडा, भाटखेडाला भेटीसह संवाद

उटखेडा येथे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच कुंदन महाजन यांनी धनुभाऊंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आ.शिरीषदादा चौधरी यांनी मागील पाच वर्षात प्रत्येक गावात दिलेल्या भरघोस निधी व विकासकामांबाबत ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

सावखेडा येथे सरपंच युवराज कराड, रशीद तडवी, अलाउद्दीन तडवी, शकील तडवी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी कलीम तडवी, सोहेल तडवी, आरीफ तडवी, गुलशेर तडवी, खलील तडवी यांची उपस्थिती होती.सावखेडा खुर्द येथे मिलिंद चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते जलपूजन झाले.यावेळी रवींद्र चौधरी, रवींद्र बखाल, मोहन बखाल, नितीन बखाल, लतीफ तडवी, फिरोज तडवी, हमीद तडवी, चेतन कोळी यांची उपस्थिती होती.

उटखेडा येथे सरपंच कुंदन महाजन यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच एएसआय संतोष शामराव महाजन, यशवंत शामराव महाजन यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमावेळी राकेश तायडे, महेंद्र पाटील, यशवंत महाजन, जगन कोळी, शिवराम पाटील, गोटू चौधरी, विनोद महाजन, मोहन महाजन, नारायण पाटील, रवींद्र पाटील, गौरव पाटील, शिवम पाटील, अमोल महाजन, उमेश पाटील उपस्थित होते.

भाटखेडा येथे सरपंच गुलाब रामभाऊ पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी कैलास पाटील, दिलीप पाटील,बाळू पाटील, विनोद धनगर, नारायण पाटील यांनी उपस्थिती देऊन यात्रेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here