चोपड्यात गर्भाशयासह स्तन कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद

0
42

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी आणि भविष्यातील धोके कळावे, यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रोटरी क्लबतर्फे गर्भाशयासह स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिरात २०० पेक्षा जास्त महिलांची विनामूल्य तपासणी केली. तपासणीअंती ज्या महिलांना केवळ औषधोपचाराची आवश्‍यकता आहे, त्यांना रोटरी क्लब चोपडाच्यावतीने मोफत औषधी पुरविण्यात आली.

उपक्रमासाठी रोटरी मिडटाऊन, अमरावती क्लबच्यावतीने तयार केलेली मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरणार असून त्या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ. पराग पाटील, सह प्रकल्प मार्गदर्शक संजीव गुजराथी, डॉ. वैभव पाटील, एम. डब्लु. पाटील उपस्थित होते.

डॉ. पराग पाटील आणि डॉ. वैभव पाटील यांनी परिसरातील महिलांना भविष्यात आवश्‍यकता भासल्यास महिलांची पॅपस्मियर तपासणी मोफत करुन देण्यात येईल, असे सांगितले. शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, अंगणवाडी सेविकांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरासाठी रोटरी सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन विलास पाटील तर सचिव अर्पित अग्रवाल यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here