मुक्ताईनगरला एड्सबाबत कायदे विषयक जनजागृती शिबिराला प्रतिसाद

0
17

एड्सबाबत सामाजिक अंधश्रद्धा, गैरसमजवर मार्गदर्शन

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुक्ताईनगर येथे तालुक्यातील आशा सेविका यांच्यासाठी एचआयव्ही रुग्ण आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे रोग या गंभीर सामाजिक विषयाबाबत जनजागृती शिबिर आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार गिरीष वखारे होते. यावेळी वकील संघाचे सचिव अँड.विनोद इंगळे, आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय समुपदेशक रितेश गवई, पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी अनिल वराडे, पंचायत समिती अधीक्षक सुधाकर राठोड, आशा सेविका सुपरवायझर प्रतिभा सोनटक्के, तालुक्यातील संपूर्ण आशा सेविका उपस्थित होत्या.

शिबिरात समुपदेशक गवई यांनी एचआयव्ही लागण खबरदारी, उपाययोजना, एड्सबाबत सामाजिक अंधश्रद्धा, गैरसमज यावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष तहसीलदार वखारे यांनी एड्सबाधीत व्यक्तीस २०१७ च्या कायद्यानुसार गोपनीयता आणि इतर आवश्यक सुखसुविधा तसेच वैद्यकीय उपचार, संशोधन, एचआयव्ही लक्षणेबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमितकुमार घडेकर, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी युवराज अढागळे यांनी परिश्रम घेतलेे. प्रास्ताविक अॅड विनोद इंगळे, सूत्रसंचालन तथा आभार अॅड शैलेंद्र वानखेडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here