पाळधीतील महाविद्यालयात एड्स दिनानिमित्त शिबिराला प्रतिसाद

0
11

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर

येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, मुख्य मार्गदर्शक तथा वक्ते डॉ. उत्पल कुंवर, डॉ. स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. उत्पल कुंवर, डॉ. स्वप्निल पाटील यांनी एड्स आजाराबद्दल सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांना योग्य ती माहिती देत एड्स आजाराची लक्षणे, लागण, त्याविषयी अफवा, उपचार पद्धती अशा सर्व गोष्टींविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून दिले. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक तथा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय कंखरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनील कोळी, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य प्रा. जयश्री सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्रा. यु.के.फासे, प्रा. कल्याणी पवार यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी स्वयंसेवक दिनेश सोनवणे, शेख साहिल, शुभम सोनवणे, योगिता पाटील, रितिका महाजन, तेजल पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.संजय बाविस्कर, सुत्रसंचलन प्रा.उर्मिला कंखरे तर रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आश्‍विनी श्रावणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here