मलकापूर : प्रतिनिधी
येथील सेठ बी.जे.संचेती लोकसेवा ट्रस्टद्वारा आणि साधू वासवाणी, पुणे यांच्या सहकार्याने रविवारी, २० ऑगस्ट रोजी मलकापूर येथील महावीर भवन येथे मोफत कृत्रीम हात, पाय शिबिराचे (आर्टिफिशियल लिम्ब कॅम्प) आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अमरसेठ संचेती होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.साहेबराव मोरे, भा.रा.काँ.चे शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील, डॉ.विजय डागा, भा.रा.काँ.चे जिल्हा सचिव शिरीष डोरले, मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, हनुमान सेना प्रमुख अमोल टप, संजय श्रीमाळ, मेजर नामदेवराव पाटील, दिलीप गोळीवाले, अशोक संचेती, अमित संचेती, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साधू वासवाणी यांच्या चमुने शिबिरात उपस्थित झालेल्या १०५ अपंग बांधवांची तपासणी केली. त्यामध्ये निवड झालेल्या अपंग बांधवांच्या हात व पायाचे माप घेण्यात आले. त्यांना लवकरच कृत्रीम हात व पायाचे वाटप केले जाणार आहे.
यांची होती उपस्थिती
शिबिरावेळी मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, शालीग्राम पाटील, बळीराम बावस्कार, अजीत फुंदे, शिवाजी भगत, अजय गाढवे, किशोर पानट, दिव्यांग मल्टी परपज फाउंडेशनचे निलेश चोपडे, नागेश सुरंगे, अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे कलीम शेख, शेख वसीम, सचिन मोरे, निखील पोंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी हनुमान सेना, संजय श्रीमाळ त्यांची टिम, सेठ बी.जे. संचेती लोकसेवा ट्रस्ट, प्रहार जनशक्ती पक्ष, मूकबधिर मतिमंद विद्यालय, दिव्यांग मल्टी पर्पज फाउंडेशन, अपंग जनता दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.