सांस्कृतिक महोत्सव ‘रेझोनन्स’ नुकताच उत्साहात पार पडला.महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती, इतिहासप्रेम व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडवणारा दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘रेझोनन्स’ नुकताच उत्साहात पार पडला.महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब घोलप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या वार्षिक कॅलेंडर २०२६ चे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास मानसी धीरज बाविस्कर, उमेश करोडपती, डॉ. विकास हरताळकर, घनश्याम अग्रवाल, वैशाली पंडित, प्रवीण सोनवणे, सुभाष पटेल, प्राचार्य अरुण पाटील, प्राचार्या सुरेखा मिस्त्री आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. संस्थेतर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पहिल्या दिवशी बॉलीवूड थीमअंतर्गत हिंदी, मराठी व अहिराणी गाण्यांवर आधारित विविध नृत्यप्रस्तुती सादर करण्यात आल्या. लहानांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या मेहनत व सरावाचे सुंदर दर्शन या सादरीकरणातून घडले.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रवीण राखेचा, सुनील बर्डिया, प्रसाद काबरा, दीपक पाटील, डॉ. नीता जैस्वाल, धनंजय पाटील, नितीन काबरा यांच्यासह संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, चेअरमन पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, सचिव गोकुळ भोळे, मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.आर.आर.अत्तरदे, मुख्याध्यापिका मीना माळी, केतन माळी, हेमलताताई बोरोले, दिपालीताई बोरोले आदी मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘स्वराज्य थीम’. आतापर्यंत सादर झालेल्या सर्व थीमपैकी प्रेक्षकांनी या थीमला विशेष पसंती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रस्तुती आकर्षक ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हेमंत परदेशी यांनी साकारली, बाळ शिवाजीच्या भूमिकेत रिशान बोरोले व वेदिका पाटील, बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जितेश पाटील तर जिजामातेच्या भूमिकेत देवयानी चोले हिने अत्यंत प्रभावी अभिनय केला. ऐतिहासिक वेशभूषा, शस्त्रसज्जता व युद्धदृश्यांच्या थरारक सादरीकरणामुळे संपूर्ण मंच जणू गड-किल्ल्याचे रूप धारण करत होता. पालक, शिक्षक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.याप्रसंगी चेअरमन पंकज बोरोले यांनी मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम व राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हाच ‘स्वराज्य थीम’मागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे विभाग प्रमुख म्हणून यश महाजन व अमित पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन देवयानी चोले, देवयानी मुकेश पाटील, साक्षी रावण, आस्था देशमुख व तनिष्का महाजन यांनी केले. त्यांना शुभांगी पाटील, स्वाती शिंदे, उपमा जैस्वाल, शारदा अहिरे व धनंजय सोनवणे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. स्वराज्य थीम नाटिकेसाठी स्वाती सोनवणे व प्रीती पाटील यांनी विशेष योगदान दिले. हस्तसाहित्य व दृश्य साहित्य कला शिक्षिका शिल्पा मॅडम व त्यांच्या समूहाने तयार केले. प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हा संपूर्ण महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.
