भारताचे संविधान प्रस्तावना ‘हर घर घर’ पोहचविण्याचा केला संकल्प

0
5

मुक्ताईनगरला संबोधी नगरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी

धम्मचक्र प्रवर्तन दिनी सम्यक संबोधी बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संबोधी बुद्ध विहाराचे नियोजित जागेला संरक्षणासाठी तार कंपाऊंड तयार झालेले अाहे. महिलावर्ग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला पंचशील ध्वजाला बौद्ध उपासक व उपासिका यांच्या समवेत डिव्हिजनल ऑफिसर समता सैनिक दल अरुण वानखेडे यांनी सलामी दिली. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे होते. उद्घाटक राज्य संघटक के.वाय.सुरवाडे होते. प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वंदन करण्यात आले.

यावेळी भारताचे संविधान प्रस्तावना तालुक्यातील ‘हर घर घर’ पोहचविण्याचा संकल्प तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला. यावेळी प्रा. डॉ. संजीव साळवे, साहित्यिक डॉ. अ. फ. भालेराव, जयपाल बोदडे, के.वाय.सुरवाडे, पी.डी. सपकाळे, बी.डी.गवई, रवींद्र मोरे, अरुण वानखेडे, एन.जी.शेजवडे, मोहन मेढे, रवींद्र झनके यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी जनार्दन बोदडे, विक्रम धुंदले, दीपक इंगळे, लखन पानपाटील, युवाध्यक्ष कैलास अडायंगे, सुनील सावळे, दिनेश बगाडे, प्रवीण झणके, भीमराव इंगळे, जगदेव इंगळे, आशिष शेजवडे, चेतन धनके, महिला आघाडीच्या आरती गवई, उषा वाघ, पुष्पा सपकाळे, प्रतिभा गवई , उपासिका उपस्थित होत्या. सूत्रसंचालन तथा आभार सम्यक संबोधी बुद्धी ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. कुणाल गवई यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here