साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी
तळोदा उपविभागातील तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातील कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासन धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय तळोदा कार्यालयातील सभागृहात सोडत करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले.
तळोदा तालुक्यातील ६ सजामध्ये नळगव्हाण, करडे, सोमावल बु. कडेल, मोड, बोरद तर अक्कलकुवा तालुक्यातील ७ सजामध्ये मोरंबा, ब्राम्हणगाव, रायसिंगपूर, काठी, सिंगपूर बु., मांडवा व डाब असे १३ राजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत. यासाठी शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या ८० टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच ८० टक्के रिक्त साजामधुन निश्चित झालेल्या साजांत शासन धोरणानुसार ३० टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यातील संबंधित गावातील नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही पत्की यांनी केले आहे.