साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी बुधवारी होणाऱ्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.
जुलै ते आक्टोंबर महिन्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बुधवारी आरक्षण व सोडत काढण्यात येणार होती परंतु मंगळवारी अचानक सोडत व आरक्षण कार्यक्रमास नवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सोयगावला बुधवारी होणारी सोडत रद्द करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे कि,दि.५ जुलैच्या पत्रानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत कार्यक्रम देण्यात आला आहे,परंतु सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष याचिकेबाबत राज्यशासनाने दाखल केलेल्या अर्जाबाबत दि.१२ जुलैला घेण्यात येणारी सुनावणी झाली असून पुन्हा एका आठवड्यान्नातर सुनावणी होणार आहे.सदर पार्श्वभूमीचं अनुषंगाने निवडणूक आयोगाने दि.५ जुलैला दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण व सोडतीची तूर्त स्थगिती देण्यात आली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे.यासंदर्भात पुढील सुधारित आरक्षण व सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.त्यामुळे सोयगावला होणाऱ्या सहा पंचायत समितीच्या गणांची आरक्षण व सोडत स्थगित करण्यात आल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले आहे.