साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २६जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दीपक वामन पाटील हे होते.तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, काशिनाथ पलोड स्कूलचे एस.एम.सी. सदस्य सरल चोपडा , शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, समन्वयिक संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे उपस्थित होत्या. डॉ . दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांची परेड घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून दाखवल्या. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील काही विद्यार्थी पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारत माता, तसेच शिवाजी महाराज यांचा पोशाख परिधान करून आले होते. कार्यक्रमाची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयश आणि अदिती व्यास यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.