साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालय मलकापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय लॉबार्ड मुंबई येथील विनोद महाजन, राजीव गांधी तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील प्रा.एस. डी. पाटील यांची उपस्थिती लाभली.
यावेळी विनोद महाजन, प्रा.एस. डी. पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, असे संबोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाला प्रशासकीय डीन युगेश खर्चे, नितीन खर्चे, रमाकांत चौधरी, संतोष शेकोकार, संदीप खाचणे, राजेश सरोदे, सुदेश फरफट, योगेश सुशीर, मो. जावेद, महेश शास्त्री, तेजल खर्चे, संगीता खर्चे, मंजिरी करांडे, माधुरी तोशनिवाल, मयुरी पाटील, माधुरी राजपूत यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.