मशिदीवरील ध्वनी प्रदूषण करणारे भोंगे काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करा

0
28

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

ध्वनी प्रदुषणासंबंधीचा कायदा हा जुना आहे. आजपर्यंत या कायद्यान्वये शहरातील मशिदीवरील ध्वनीवर्धकांमुळे (भोंग्यामुळे) होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कुठलीही कारवाई केलेली नाही. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखलाही दिला आहे. तसेच शहरातील सर्व मशिदीवरील ध्वनीवर्धकामुळे होणारे ध्वनी प्रदूषण तातडीने थांबवून ते ध्वनीवर्धक काढावेत आणि अशा पध्दतीने गुन्हे करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशा आशयाचे निवेदन शहरातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटना, गणेश मंडळातर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी स्वीकारले. निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयालाही दिले आहे.

शहरातील विविध भागातील सर्वच मशिदीवरील ध्वनीवर्धकाद्वारे (भोंग्याद्वारे) होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे सर्वसामान्यांना अतिशय त्रास होतो. अनेक वर्षापासून वेळी-अवेळी भल्या पहाटे होणाऱ्या ध्वनीवर्धकाच्या (भोंग्याच्या) आवाजामुळे परिसरातील लहान मुले, विद्यार्थी, वयस्कर तसेच आजारी रुग्ण आदींना शारिरीक त्रासांसह मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्रासदायक आवाजाने ग्रस्त असुनही हे प्रदूषण धार्मिक कारणांसाठी होत असल्याचा विचार करून सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे ध्वनी प्रदुषणाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, यावर्षी शहर पोलिसांनी शहरातील तब्बल ३० गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर रात्री १२ वाजेनंतर पारंपरिक वाद्य वाजवून ध्वनी प्रदूषण केले म्हणून अनेक कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर यशवंत चौधरी, अनिल वानखेडे, गजेंद्र जैस्वाल, नरेश महाजन, प्रेम घोगरे, निलेश बारी, मोहित भावे, गौरव सोनार, जितेंद्र महाजन, योगेश बारी, संदीप चव्हाण, देवेंद्र बाविस्कर, मनोज विसावे, समाधान माळी, प्रथम शर्मा, अशोक शेटे, नितीन महानुभाव, रुपेश कासार, नीरज सोनवणे, गणेश विसावे, सागर चौधरी, शुभम माळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, आणि सकल हिंदू आघाडीचे संयोजक आदींना रवाना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here