साईमत जळगाव जळगाव
“ईव्हीएम मशीनला हटवा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, आणि लोकतंत्र वाचवा” या मागणीसाठी भारतातील ५६७ जिल्ह्यात मंगळवार दि. १६ रोजी एकाच वेळी निवडणूक आयोगाच्या असंवैधानिक कामकाजा विरोधात मोर्चाचे आयोजन मारत मुक्ती मोर्चा मार्फत करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव शाखेच्या वतीने शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास सुरुवात झाली.
भारत मुक्ती मोचाचे खान्देश प्रभारी नितीन गाडे, जळगाव जिल्ह्य अध्यक्ष देवानंद निकम, बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सह संयोजक सौमित्र अहिरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम निवडणुका घेण्यात आल्या २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ईव्हीएमचा गैरवापर केला. या निवडणुकात ईव्हीएम मध्ये घोटाळा करून काँग्रेसच्या काँग्रेसने निवडणूक जिंकली असा आरोप करत या आशयाची याचिका भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात दाखल केली होती, तसे पुरावे देखील सुप्रीम कोर्टात त्यांनी दिले होते.
ईव्हीएम मशीन द्वारे निष्पक्ष, भयमुक्त व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही यासाठी १०० टक्के व्हीव्हीपॅड मशीन जोडण्यात याव्या असा निकाल सुप्रीम कोर्टाने ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दिला होता, परंतु निवडणूक आयोगाने फक्त 0.33 ठिकाणी व्हीव्हीपॅड मशीन लावण्यात आल्या यावेळी “न्यायालयाचा अवमान निवडणूक आयोगाने केला” अशी याचिका भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली व १०० टक्के ठिकाणी व्हीव्हीपॅड मशीन लावण्याची मागणी केली परंतु काँग्रेस नेते अभिषेक मनु संघवी यांनी ५० टक्के व्हीव्हीपॅड मशीन लावण्यात यावा अशी याचिका दाखल केली. यावर सुप्रीम कोर्टाने ८ एप्रिल २०१९ रोजी फक्त एक टक्के व्हीव्हीपॅड मशीन मधील चिठ्ठ्यांची मोजणी करावी असा निकाल दिला.
लोकांचा आक्षेप ईव्हीएम मशीनवर आहे. आजही ईव्हीएम मशीन मधील मतांची मोजणी होऊन निकाल लावण्यात येतो १०० टक्के व्हीव्हीपॅड मशीन मधील शंभर टक्के चिठ्ठ्यांची जर मोजणी झाली तर ईव्हीएममधील हेराफेरी पकडली जाऊ शकते, म्हणून या चिठ्ठ्यांची मोजणी करावी अशी नागरिकांची न्याय मागंगी आहे. परंतु असे होतान दिसत नाही कारण ? एक टक्केच चिठ्ठ्यांची मोजणी होते.
ईव्हीएम मशीनला जन्म देणाऱ्या जपान, जर्मनी, युरोप व अमेरिका या देशात बॅलेट पेपरवर निवडणूका होतात. आपल्या देशात नागरिकांची बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आहे, तरीपण ईव्हीएम मशीनद्वारेच निवडणुका का घेतल्या जातात ?
निवडणूक आयोगाने ४९ एएम, ५६सी व ५६ डी नावाचे कायदे करून भारतीय नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे.या कायद्यामुळे निष्पक्ष भयमुक्त व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत. जागतिक बौद्धिक संपदा संघटनने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅड मशीनला पेटंट ( मान्यता) देण्याचे नाकारले. याचा अर्थ या दोन्ही मशिनला पेटंट नाही तरीही निवडणूक आयोग भारतात या मशीनद्वारे निवडणूक का घेत आहे. अश्या प्रकारच्या २० मागण्यासांठी सदर मोर्चा आयोजित केला होता.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, शहर संयोजक सुनील देहडे, सागर भालेराव, राहुल सोनवणे, राजू खरे, विनोद अडकमोल , डॉ. शाकीर शेख, प्रमोद पाटील, विनोद कोळी, नीतू इंगळे, मुकेश नेतकर, नितीन गाडे, भागवत जाधव, तसेच जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.