चाळीसगावला सोड्याच्या गाडीचे अतिक्रमण काढा

0
7

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

भडगाव रस्त्यालगत ‘माधव सर्व्हिस सेंटर’ नावाने खुशाल पाटील यांचे चारचाकी आणि दुचाकी गाड्या सर्व्हिसिंगचे दुकान अनेक दिवसांपासून सुरु आहे. दुकानाच्या समोर अतिक्रमण करून सोड्याची गाडी अनधिकृतपणे सुरू केली आहे. म्हणून सोमवारी, १६ ऑक्टोबरपासून खुशाल पाटील यांनी चाळीसगाव नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

सोड्याच्या गाडीवर गिऱ्हाईकांची मोठी गर्दी होऊन मोटारसायकली दुकान समोर लावल्याने दुकानाकडे जाण्यास रस्ता राहत नाही. तसेच सोडा पिण्यास महिलाही तेथे येतात. वाहने धुत असतांना अनावधानाने महिलांच्या अंगावर पाणी उडते. त्याचे कारण करून सोड्याची गाडी चालक सचिन जाधव याने खुशाल पाटील यांच्याशी अनेकवेळा वाद घातले आहेत. वास्तविक ठेलागाडी रहदारीच्या मुख्य रस्त्यावर आहे. वाहतुकीला ठेला गाडीचा अडथळा निर्माण होतो. अर्जदार यांच्या दुकानासमोर सोडा पिण्यास आलेले गिऱ्हाईक मोटारवाहने लावतात. त्यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे माझे दुकान बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

सचिन जाधव यांना अनेकवेळा सोडागाडी काढण्यास सांगितल्याचा राग येऊन खुशाल पाटील यांना धमकी देत असतो. भडगाव रस्त्यावरील अतिक्रमण केलेली सोडा गाडी काढण्यात यावी. म्हणून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे यांना ९ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. अनधिकृतपणे सुरू असलेली सोडा गाडी काढली नाही, म्हणून पुन्हा १२ ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा अर्ज केला होता. मात्र, अद्यापही नगरपरिषदेने सोडा गाडी काढली नाही. त्यामुळे अखेर खुशाल पाटील नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here