साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी, २२ जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण होते. यानिमित्त महाराष्ट्रातील विविध राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच गावागावात दिवाळी साजरी करण्यात आल्याचे चित्र होते.
तालुक्यातील पातोंडा येथील राम मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गावात या दिवसानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी रोषणाई आणि सजावट करण्यात आली. तसेच दारापुढे सडामार्जन करुन सुबक काढलेल्या रांगोळी लक्ष वेधून घेत होत्या. सुरुवातीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामाची पूजा केली. प्राणप्रतिष्ठा दिनाच्या दिवशी रामभक्तांनी राम नामाचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली.