मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ‘भारतातील क्रांतिकारी महिला’ पुस्तकाचे प्रकाशन

0
99

क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल उपशिक्षक अनिल पाटील यांचे कौतुक

साईमत/न्यूज नेटवर्क/अमळनेर :

येथील शिक्षक अनिल नथू पाटील, डॉ.बळीराम पवार लिखित आणि संपादित ‘भारतातील क्रांतिकारी महिला’ पुस्तकाचे प्रकाशन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शनिवारी, २७ जुलै रोजी करण्यात आले. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल उपशिक्षक अनिल पाटील यांचे कौतुक केले. पुस्तकात राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई, ताराबाई शिंदे, वि. मालिनीताई राजुरकर अशा विविध थोर महिलांचे लेख समाविष्ट आहेत. पुस्तकाचे प्रकाशक संस्कृती पब्लिकेशन, लातूर हे असून पुस्तकाला ISBN नंबर प्राप्त आहे.

अनिल पाटील हे उपशिक्षक आहेत. ते विजयनाना पाटील आर्मी स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होते. सध्या ते अमळनेरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. माझी स्व.आई जिजाबाई पाटील यांच्या प्रेरणेने मी हे पुस्तक लिहिले असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. प्रकाशन सोहळावेळी मा. नगरसेवक विनोद कदम, नगरसेवक राजेश पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा केशवा ॲडव्हर्टायझिंगचे संचालक गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.

यांनी केले कौतुक

अनिल पाटील यांच्या पुस्तकाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका सौ. शिलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी.पाटील, प्रशासकीय अधिकारी श्याम पवार, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य गायत्री भदाणे, विजय नाना पाटील आर्मी स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही.जी. बोरसे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, डी. एस.पाटील, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विजय नाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here