साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेच्या सन २०२४ दिनदर्शिकेचे विमोचन श्रीराम मंदीर संस्थानचे विद्यमान गादीपती ह. भ. प. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते बँकेचे मुख्यालय सेवा येथे करण्यात आले.
दिनदर्शिकेचे विमोचन प्रसंगी श्रीराम मंदीर संस्थानचे गादीपती ह. भ. प. मंगेश महाराज जोशी, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष सीए कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, संचालक हरीशचंद्र यादव, जयंतीलाल सुराणा, सीए नितीन झवर, सुशील हासवाणी, डॉ पराग देवरे, संचालिका संध्या देशमुख, कर्मचारी प्रतिनिधी ओंकार पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) संजय नागमोती, राजेंद्र नन्नवरे, क्षुधाशांती सेवा संस्थाचे प्रकल्प प्रमुख संजय बिर्ला, आदी उपस्थित होते.
सभासदांसाठी विविध योजना राबविणार्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येते. यावर्षी बँकेच्या वतीने विजयशालिनी तेजस्वी वारसा या विषयास अनुसरुन सन २०२४ च्या दिनदर्शिकेत भारतभूमीवर अनादीकालापासून झालेल्या परकिय आक्रमणांना समर्थपणे तोंड देऊन ती परतवून लावणार्या वीर योद्धांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.
दिनदर्शिकेचे विमोचन आज रोजी श्रीराम मंदीर संस्थानचे विद्यमान गादीपती ह भ प श्री मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते बँकेचे मुख्यालय सेवा येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. दिनदर्शिका सोमवार दिनांक ८ जानेवारी पासून सभासदांना बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होणार आहेत असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे



