Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»नरबळीचा गुन्हा दाखल करण्यासाठी सावदा पोलिसात नातेवाईकांचा ठिय्या
    रावेर

    नरबळीचा गुन्हा दाखल करण्यासाठी सावदा पोलिसात नातेवाईकांचा ठिय्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तापी नदीत युवकाचा बुडवून मृत्यू : सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

    साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :

    देवीच्या पुजेसाठी हतनूर धरणाच्याखाली तापी नदीवर गुलाब सुरेश तायडे (वय २६, रा.मदिना नगर, सावदा, ता.रावेर) हा त्याचे मित्र प्यारेलाल रामकृष्ण लोखंडे याच्यासोबत सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी गेला होता. तिथे त्याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा पोलिसांसह नातेवाईकांनी शोध घेतला. तेव्हा त्याचे प्रेत मंगळवारी, २० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास रायपूर, ता.रावेर शिवारातील नदीपात्राच्या किनाऱ्यालगत मिळून आले. याबाबतची खबर सावदा येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी अनिकेत जीवन सुरवाडे यांनी दिल्यावरून सावदा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे. मयत तरुणावर २१ ऑगस्ट रोजी सकाळी अंतिम संस्कार झाल्यानंतर नातेवाईकांनी थेट सावदा पोलीस ठाण्यात जन आंदोलन केले. सोबत असलेल्या दोघा व्यक्तींवर जादुटोणा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी तब्बल तीन तास लावून धरली. आरोपी आमच्या ताब्यात द्यावा, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.

    याप्रकरणी कायद्यान्वये जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे पोलिसांसमोर पेच प्रसंग निर्माण झाला होता. यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतील, असे आश्वासन पोलिसांकडून मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करताना देण्यात आले. याप्रसंगी निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, फैजपूर पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक सैय्यद, सावदा पो.स्टे.चे सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जमावास शांत केले. यावेळी निंभोरा, फैजपूर, सावदा येथील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.

    संशयित ‘भोंदूबाबावर’ गुन्हा दाखल करावा

    सावदा येथे स्वतःला कालिकेचा भक्त म्हणून घेणाऱ्या बाबाने मयत युवकास काहीतरी आमिष दाखवत नदीपात्रात नेऊन मयत व्यक्तीने त्या भोंदूबाबावर विश्वास ठेवल्यावर त्याला नदीच्या पाण्यात डुबकी लावण्यास सांगितले. नदीतील पाण्यातून युवक वर न आल्याने तो बुडाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तश्या प्रकारचा व्हीडीओही नातेवाईकांकडे असल्याचे समजते. त्यामुळे काहीतरी प्राप्त करण्यासाठी युवकाचा नरबळी दिल्याची शहरात सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशा संशयित ‘भोंदूबाबावर’ जादूटोण्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईक करीत होते. यासंदर्भात मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांना अर्ज दिल्याची माहितीही मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.