ताणतणावमुक्त जीवनासह नियमित व्यायाम हेच औषध

0
77

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

माणसाने आयुष्यात नियमित व्यायाम केला पाहिजे. ताणतणावमुक्त जीवन जगल्यास माणसाला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागणार नाही. तसेच वाढत्या हृदयविकाराच्या त्रासामुळे प्रत्येकाने दरवर्षी जर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्राथमिक तपासण्या केल्यास आपण हृदयविकार टाळू शकतो. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास प्राथमिक कशा प्रकारे सीपीआर द्यावा, सीपीआर देण्याचे प्रात्यक्षिक करुन त्याचे महत्व डॉ. सुजित वाघ यांनी सीपीआर मार्गदर्शन शिबिरात सांगितले. जेसीआय चाळीसगाव सिटी आणि भारतीय आयुर्विमा निगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीपीआर मार्गदर्शन शिबिर ७ मे रोजी चाळीसगाव येथील भडगाव रस्त्यावरील भारतीय आयुर्विमा निगमच्या मिटींग हॉलमध्ये घेण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आयुर्विमा निगम चाळीसगाव शाखेचे शाखाधिकारी संजय मोरे, सीए जेसी निलेश गुप्ता, मार्गदर्शक म्हणून डॉ. सुजित वाघ उपस्थित होते. यावेळी संजय मोरे यांनी उपस्थितांना निरोगी राहण्याबाबत मार्गदर्शन केले तर सीए जेसी निलेश गुप्ता यांनी जेसीआय जागतिक संस्थेबाबत सर्वांना माहिती दिली.

कार्यक्रमास एलआयसी एजंट अजय पाटील, प्रशासनीक अधिकारी योगेश तायडे, विजय पाटील, राजेश गवारे, अनिल गोत्रे, स्मिता मांडे, प्राजक्ता जगताप, सुप्रिया गायकवाड, प्रकल्प प्रमुख जेसी मंगेश जोशी, जेसी संजय पवार, जेसी निरज येवले, जेसी आतीश कदम, जेसी महेंद्र कुमावत, जेसी मयूर अमृतकार आदी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, महेश चौधरी, कैलास गोयर यांच्यासह सर्व जेसीआय सदस्य, एलआयसी ऑफीसमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक जेसीआय चाळीसगाव सिटीचे अध्यक्ष जेसी नरेंद्र शिरुडे, सुत्रसंचलन जेसी चंद्रकात ठाकरे तर आभार सचिव जेसी मनोज पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here