शासनाच्या ‘सलोखा’ योजनेतंर्गत पहिल्या दस्ताची नोंद

0
6

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शेतजमिनीचा ताबा आणि वहीवाटीबाबत शेतकऱ्यातील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी, समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र १ हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याची ‘सलोखा’ योजना राबविण्यास शासनाने ३ जानेवारी २०२३ रोजी मान्यता दिली.

‘सलोखा’ योजनेनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला दस्त तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांच्या प्रयत्नाने नोंदविला गेला. विशेष बाब म्हणजे त्यांनी दस्तावर स्वतः साक्षीदार म्हणून सही करून या योजनेत इतर शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुक्ताईनगर तालुक्यातील उमरे गावातील गट नंबर ५४/१ आणि ५४/२ यातील शेतकरी अनिल पवार आणि गीताबाई पवार यांनी योजनेचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here