Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्याच्या लोकन्यायालयात ४ कोटी १८ लाखांची वसुली
    पाचोरा

    पाचोऱ्याच्या लोकन्यायालयात ४ कोटी १८ लाखांची वसुली

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 23, 2025Updated:March 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोऱ्याच्या लोकन्यायालयात ४ कोटी १८ लाखांची वसुली

    पाचोरा (प्रतिनिधी)-

    पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या न्यायालयाचे अध्यक्षस्थान प्र. अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांनी भूषविले.

    या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे, तसेच द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील १६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात २ कोटी ४ लाख १४ हजार ५८३ रुपयांची वसुली झाली. तसेच वादपूर्व ८९२ प्रकरणे निकाली निघून २ कोटी १४ लाख २६ हजार ८९२ रुपयांची वसुली करण्यात आली. एकूण १०५८ प्रकरणांचा निपटारा करत ४ कोटी १८ लाख ४१ हजार ४७५ रुपये वसूल करण्यात आले.

    दहा वर्षांपासून प्रलंबित चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली, कौटुंबिक वादातील २० प्रकरणे सोडवण्यात आली.

    पॅनल प्रमुख म्हणून जी. एस. बोरा यांनी काम पाहिले, पंच सदस्य म्हणून ललिता पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. या लोक न्यायालयाच्या आयोजनासाठी पाचोरा न्यायालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, बीएसएनएल आणि महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.