साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील हिंदू धर्मियांचा स्वाभिमान व अभिमान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभुमी मंदिराची भव्यदिव्य प्रतिकृती पाचोरा शहरात साकारण्याचे काम तब्बल ३० ते ४० कलाकारांच्या हातून सुरु होते.’ गणेशोत्सव २०२३”चे भव्यदिव्य देखावे साकारण्याच्या परंपरेमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आ.किशोर पाटील यांनी सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. ते अखंड हिंदुस्थानात फक्त हिंदू धर्माचे बनायेगे मंदिर हेच स्वप्न आहे. हे आ.किशोर पाटील पुत्र सुमित पाटीलच्या संकल्पनेतून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त खास पाचोरावासीयांसाठी हिंदू धर्मियांचा अभिमान असलेले अयोध्या येथील श्रीराम जन्म मंदिर उभारण्याचे काम मागील ३० दिवसांपासून सुरु आहे. हे मंदिर भव्य आकाराचे आहे. पाचोरा शहरातील मानसिगका मैदानावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून भक्तांनी पहायला गर्दी करायला सुरू केली. गेल्यावर्षी याचं जागेवर आ.किशोर पाटील आणि सुमित पाटील यांनी काशी विश्वनाथचे दर्शन पाचोरावासियांना दिले होते.