‘Reading Of Bahinabai’s Poems’ : ‘रोटरी वाचन कट्टा’ अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’

0
10

कविता सादर करणाऱ्यांचा प्रशस्तिपत्रक देवून सन्मान

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील ‘अभियंता भवन’ येथे रोटरी क्लब आणि व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ‘रोटरी वाचन कट्टा’ उपक्रमा अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’ अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात बहिणाबाईंच्या कविता सादर करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देवून सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचे वाचन, त्यांचे रसग्रहण केले. त्यांच्या काही ओव्यांचे गायन केले. कवयित्री पुष्पा साळवे यांनी बहिणाबाईंचा जीवनपट उलगडून दाखविला आणि बहिणाबाईंवर स्वरचित कविता प्रभावीरित्या सादर केली. ‘अभियांत्रिकी स्पंदने’ पुस्तकाचे लेखक इंजि. प्रा. डॉ. महेंद्र इंगळे यांनी मनोगतात मानवी मनाच्या वर्तनावर भाष्य केले आणि अध्यात्मही सांगितले. कवयित्री ज्योती वाघ, संगीता महाजन, प्रिया सफळे, शिक्षीका अर्चना पाटील, महिला अधीक्षिका प्राची पाटील आणि पूर्वेश पाटील, योगेश पाटील या विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन केले.

कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सचिव सुभाष अंमळनेरकर, कार्यकारी सचिव पंकज व्यवहारे, एनक्लेव चेअरमन जितेंद्र ढाके, व. वा. वाचनालयाच्या मानद सचिव प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, अभियंता पतपेढीचे चेअरमन प्रमोद पाटील, व्हा. चेअरमन चंद्रशेखर तायडे, संचालिका स्वाती नन्नवरे, संचालक सुभाष चव्हाण, ब्रह्मानंद तायडे, दीपक निकम, लता इंगळे, रोटरी क्लब, व. वा. वाचनालय, अभियंता पतपेढीचे पदाधिकारी, जिल्हा वाचनालयाचे अधिकारी सुहास रोकडे, परिवर्तनचे हर्षल पाटील, साहित्य क्षेत्रातील मान्यवर, अभियंते, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रसिक श्रोते उपस्थित होते. प्रास्ताविकात रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी ‘वाचन कट्टा’ उपक्रमाबाबतची भूमिका स्पष्ट केली. शेवटी संस्थापक चेअरमन तथा आजीव अध्यक्ष साहेबराव पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here