साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अजित कुलकर्णी, रा.से.योजना अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.संजय चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ.अजित कुलकर्णी यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. त्यासाठी वाचन स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे, असे मार्गदर्शनात सांगितले.
प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन उपलब्ध पुस्तकातून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे, उच्च अधिकारी बनावे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक उपस्थित होते.