साईमत जळगाव प्रतिनिधी
समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नुकतेच बहिणाबाई साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय “आदर्श समाजसेवक पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.
समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील आदिवासी,अनाथ,गरीब, गरजू, वृद्ध अशा विविध घटकांसाठी कार्य करत आहे.
या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष आर. डी.कोळी यांना डॉ. अरविंद नारखेडे यांच्या हस्ते माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, मायाताई धुप्पड, वा.ना.आंधळे, भास्करराव चव्हाण, डॉ. शैलजा करोडे, विलास नारखेडे, विजय लुल्हे, तुषार वाघुळदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.