राज्यस्तरीय ‘आरोग्य सेवक’ पुरस्काराने रवींद्र सूर्यवंशी सन्मानित

0
27

ग्रामस्थांच्यावतीने सन्मान, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी नेहमी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे नांद्रा प्र.लो. येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक रवींद्र सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आरोग्य सेवक पुरस्कारासाठी नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ, सचिव ज्ञानेश्वर वाघ, शालिग्राम मालकर, डॉ.महेंद्र काबरा, मीनाक्षी चव्हाण, डॉ.शैलेंद्र भगणे, युवराज पाटील, आदर्श शेतकरी विजय पाटील उपस्थित होते. संस्थेकडून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्वामी विवेकानंदांचे विचारांचे पुस्तक देऊन रवींद्र सूर्यवंशी यांचा व्यासपीठाने सन्मान केला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

याबद्दल जामनेर आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरी येथील सर्वच आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व सर्व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले, दिवाकर पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भामरे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ढेकाळे, गावाचे उपसरपंच प्रकाश खरे, भगवान पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here