Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Breaking : बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीत आढळला; ‘घातपात’चा संशय, रावेर तालुक्यात खळबळ
    क्राईम

    Breaking : बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीत आढळला; ‘घातपात’चा संशय, रावेर तालुक्यात खळबळ

    SaimatBy SaimatDecember 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    बेपत्ता तरुणाचा मृतदेह
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत रावेर प्रतिनिधी

    रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २१ वर्षीय हितेश सुनील पाटील या तरुणाचा भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व मित्रपरिवाराने थेट निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या आंदोलन करत, हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    जळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणारा हितेश पाटील हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होता. कोणालाही काहीही न सांगता तो घराबाहेर पडल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, रविवारी १४ डिसेंबर रोजी त्याची दुचाकी भुसावळ येथील तापी पुलावर बेवारस अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, शोधकार्य सुरू असतानाच बुधवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास स्थानिक मच्छीमारांना तापी नदीत एक मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो हितेश पाटील याचाच असल्याची ओळख पटली.

    पोलिसांनी प्राथमिक प्रक्रिया करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र, हितेशच्या मृत्यूवर नातेवाईकांनी तीव्र संशय व्यक्त केला. “हा मृत्यू आत्महत्या नसून नियोजनबद्ध हत्या आहे. जोपर्यंत या प्रकरणामागील सूत्रधार आणि दोषींना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. या मागणीसाठी त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या आवारात मृतदेह ठेवून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थही घटनास्थळी जमा झाले.

    परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येईल, आवश्यक ते तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे गोळा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.

    सुमारे दोन तासांनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी विवरा खुर्द येथे नेण्यात आला. गावात शोककळा पसरली असून, तरुणाच्या आकस्मिक व संशयास्पद मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असून, हितेशच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.