रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांचा १५ ऑगस्टला होणार सन्मान

0
29

उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मानाचा ठसा ठरणार

साईमत/रावेर/प्रतिनिधी:

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांना २०२३-२४ आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा निवड समितीच्या अध्यक्षतेखाली उपक्रमात अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे आणि निवड समितीचे सदस्य, सचिव विजय सूर्यवंशी यांच्या समवेत तहसीलदार कापसे यांची निवड केली आहे. शेतकऱ्यांसाठी शेत-शिवार रस्ते मोकळे करणे आणि महसुली प्रकरणांचा मुदतीत निपटारा करणे अशा उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. अशा उल्लेखनीय कार्याबद्दल तहसीलदार बंडू कापसे यांना गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. जो त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा मानाचा ठसा ठरणार आहे.

रावेर तालुक्याची धुरा १ एप्रिल २०२३ रोजी सांभाळल्यानंतर तहसीलदार कापसे यांनी अनेक आव्हानांचा सामना करत जनतेच्या हितासाठी निष्ठेने काम केले. त्यांच्या कार्यकाळात ई-चावडी, ऑनलाईन वसुली, ई-डाटा बल्क सायनिंग, ई-पीक पाहणी अशा उपक्रमांमध्ये त्यांनी शंभर टक्के प्रगती साधली. त्यांनी संजय गांधी योजना, विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या आणि अती गरजू नागरिकांना लाभ देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here