२२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
साईमत/रावेर/प्रतिनिधी :
रावेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी एका गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुलसह दोन मॅगझिन २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पो.हे.कॉ.विष्णु बिऱ्हाळे, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन, रवींद्र पंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे यांना बोलावून कळविले.
मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लार शहाबाबाच्या दर्ग्याजवळ समोर एक जण गावठी देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी पोलीस स्टॉफ रवाना होवून संशयितास सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेवून त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ गावठी बनावटीचा एक रिव्हाल्वर, दोन मॅगझीन असा २२ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यावरुन अब्दुल अनिस अब्दुल मज्जाद (वय ४६, बड़ी खाकर, मुस्लिम कॉलनी, खतकारांद, भुसावळ) यास ताब्यात घेवून त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीकामी घेवून आले. राहुल कडू महाजन (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पो.उ.नि. तुषार पाटील करीत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, फैजपुरच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, व स्थागुशाचे पो.हे.कॉ. विष्णु बिऱ्हाळे, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे