साईमत, रावेर : प्रतिनिधी
रावेर पोलिसांनी एका मोटरसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पाच विविध कंपन्यांच्या मोटर सायकली ताब्यात घेतल्या आहे. हा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आला आहे. संबंधित चोरट्याकडून पाचही मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहे. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर रुजु झाल्यापासून अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत सुरू आहे. अशातच मोटरसायकल चोरीचा गुन्हा रावेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपी अजय वाघोरे (वय २७, रा.भोर, रेल्वे स्टेशन, रावेर) हा एक फॅशन प्रो कंपनीची (क्र.एमएच १९ बीआर ५२६९) ही मोटर सायकल चोरून आणलेली आहे. त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीत त्याच्याकडून सात हजार रुपये किमतीची मोटर सायकल, दुसरी ३५ हजार रुपये किमतीची (क्र.एमएच २८ एएक्स २५०५) मोटर सायकल, तिसरी २२ हजार रुपये किमतीची विना नंबरची मोटरसायकल, चवथी ३६ हजार रुपये किमतीची (१२ एमक्यु ५४६६) मोटर सायकल, पाचवी २८ हजार रुपये किमतीची विना नंबर मोटर सायकल अश्या पाच मोटरसायकली रावेर पोलीस प्रशासनाने जप्त केल्या आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण, पो.ना. सुरेश मेढे, पो.कॉ.समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल, पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, सुकेश तडवी, विकार शेख यांच्या पथकाने केली आहे.