Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»रावेर पोलिसांनी केला ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
    क्राईम

    रावेर पोलिसांनी केला ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सहा जणांना अटक, एक लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

    साईमत/रावेर/प्रतिनिधी :

    मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हारजीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रावेर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    रावेर शहरातील सुमन नगरातील दत्तू डिगांबर कोळी यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हार जीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करत असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रावेर गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील स.पो.नि. अंकुश जाधव, पो.हे.कॉ. रवींद्र वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे यांनी जुगाराच्या ठिकाणी जावून छापा टाकला.

    यांना केली अटक

    कारवाईत अभिषेक अनिल बानिक (वय १९, रा. नागपूर), साहिल खान वकील खान (वय २२ रा. पन्हाना, जि.खंडवा), बलविर रघुविर सोलंकी (वय २२, रा.जावल जि.खंडवा), अंकीत धमेंद्र चव्हाण (वय १९, रा. खंडवा), साहिद खान जाहीर खान (वय १९, रा.खडकवाडी, जि.खंडवा) आणि गणेश संतोष कोसल (वय २५, रा. पन्हाना, जि.खंडवा) यांना अटक केली. हे सर्वजण www. wood777.com या बेबसाईटवरून व्हॉटसॲपद्वारे लिंक पाठवून लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळासाठी प्रोत्साहन देत होते. पोलीसांनी त्यांच्याकडून ९ मोबाईल, २ लॅपटॉप, असा एक लाख १५ हजार ७०० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

    यांनी केली कारवाई

    ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.