यावलला शनिवारी रावण दहनाचा कार्यक्रम

0
75

भावी लोकप्रतिनिधींची उपस्थिती लाभणार

साईमत/यावल/प्रतिनिधी

येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे रावेर विधानसभा मतदार संघातील सर्व भावी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी, १२ रोजी सायंकाळी ६ :३० वाजता रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. येथील व्यास मंदिराजवळ सालाबादप्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम आ.शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका सौ.केतकीताई पाटील, यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचालक पांडुरंग सराफ, एनएसयुआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी आदी भावी लोकप्रतिनिधीसह आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे.

आयोजक समितीचे अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, कार्याध्यक्ष डॉ.हेमंत येवले, उपाध्यक्ष अमोल भिरुड, सचिव अमोल दुसाने, कोषाध्यक्ष विवेक सोनार यांच्यासह ६० ते ७५ सदस्यांनी, सल्लागार समिती सदस्य, स्थानिक समिती सदस्यांकडून रावण दहनाची जय्यत तयारी केली आहे.

यावल येथील रावण दहनाचा कार्यक्रम रावेर विधानसभा मतदारसंघातील कोणत्या राजकीय पक्षाच्या भावी लोकप्रतिनिधींला शुभ-अशुभ ठरणार …? हे लवकरच संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघातील नागरिकांना समजणार…असाही शहरात चर्चेचा सूर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here