रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स सुवर्णसेवेचा सुवर्णमहोत्सवा निमित्त लोगोचे अनावरण

0
21

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स सुवर्णसेवेचा सुवर्णमहोत्सवा निमित्त लोगोचे अनावरण

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

सोने, हिरे, रत्ने याबद्दल विचार मनात आला की जळगावकरांचे पाय आपसूकच वळतात ते रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडेच…! आपल्या मनमोहक कलाकुसरीने जळगावचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने ग्राहकांच्या सेवेत ५० वर्षांचा टप्पा पार केला. विश्वासाची परंपरा, दर्जेदार अलंकार, गुणवत्ता उचित दर यामुळे कोट्यवधी ग्राहकांची निष्ठा अशी ख्याती असलेले या प्रतिष्ठानाने ही मजल गाठली.

नुकतेच ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर्षोत्सव सुवर्णमहोत्सवाचे- सेवेचे आणि विश्वासाचे- १९७४ ते २०२४” हे मुद्रित केलेल्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या सुवर्णमहोत्सवी उत्सवात  ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’द्वारे ग्राहकांप्रती कृतज्ञता, मानवंदना तसेच सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीच्या दृष्टीने यावर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. ‘सुवर्ण महोत्सवानिमित्ताच्या हर्षोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमांत नाटक, संगीत मैफल तसेच इतर कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

सुवर्ण सेवेत ५० वर्षांचा टप्पा पूर्ण होणे हा ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’चे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा व गौरवास्पद उत्सव असून त्याचे अविस्मरणीय क्षण जळगावकरांसोबत द्विगुणीत करण्याचा त्यांचा मानस असल्याचे ते सांगतात. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात साजरे केले जाणारे हे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुले असणार आहेत.

याचा प्रारंभ ४ ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहातील ‘स्थळ आले धावून’ या नाट्यप्रयोगापासून होणार असून यानिमित्त जास्तीत जास्त हितचिंतक, नाट्यरसिक व जनतेनी या दर्जेदार सांस्कृतिक प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’च्या वतीने संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here