स्वतंत्र विदर्भ राज्य होण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

0
26

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे माजी आमदार वामनराव चटप, युवा आघाडी विदर्भ प्रमुख मुकेश मासुरकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुरेशराव वानखेडे, पश्‍चिम विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष श्‍याम अवथळे, तेजराव मुंढे, प्रा.राम बारोटे, एकनाथ थुट्टे, देवीदास कणखर, समाधान कणखर, रमेशसिंह चव्हाण, नामदेवराव जाधव, रणजित डोसे, दामोदर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खान्देश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर रणथम चिखली येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी महामार्ग जवळपास एक तास रोखुन धरला होता. यामुळे महामार्गावरील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती.

केंद्र सरकारने लवकरात लवकर विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, विदर्भातील जनतेचे वीजबिल निम्मे करण्यात यावे, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, शेतीपंपाला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत ३ हेक्टरपर्यंत मिळालीच पाहिजे, शेतीमालाला भाव मिळु नये, यासाठी केंद्र सरकार जे प्रयत्न करते ते बंद करण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यशस्वीतेसाठी सादीकभाई देशमुख, प्रा.एस.पी.हिवाळे, प्रा.रामदास शिंगणे, राजुभाऊ ठाकुर, सुनील नारखेडे, अनिल चंदनशीव, प्रतापसिंह राजपूत, महादेव बोपले, दिलीपसिंह राजपूत, अशोक डांगे, दिलीपसिंह जाधव, दिनेश सुशीर, निनाजी घाटे, हनुमानसिंह गौर, प्रल्हाद ठाकुर, मनोहरराव देशमुख, बाळुभाऊ वेरूलकार, सुभाष बावसकार, अर्जुन पाटील, जनार्धन बावस्कार, कुंजीलालजी धुत, सुनील खाचणे, भागवत बोरले, कैलास सुशीर, कैलास गव्हाले, सखुबाई गव्हाले, बेबी शर्मा, योगेंद्र शर्मा, विजय भोपळे, सिध्दार्थ इंगळे, मुरली महाराज येवले, ह.भ.प. रितेश महाराज, ह.भ.प. आत्माराम महाराज, बाळुभाऊ ठाकरे, गोपाल सातव, अशोक घोंगटे, राजेंद्र आगरकर, पांडुरंग बिजवे, सचिन शिंगोटे, शाहीर हरीदासजी खांदेभराड, आतीश पळसकर आदींनी सहकार्य केले.

पुढील आंदोलन देऊळगाव कुंपात २६ फेबु्रवारीला

आता पुढील आंदोलन देऊळगाव कुंपा, ता.लोणार येथे माजी आमदार वामनराव चटप आणि बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ मराठवाडा बॉर्डरवर येत्या सोमवारी, २६ फेबु्रवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here