साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेला २२ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. स्पर्धेला मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उज्ज्वला बेंडाळे आदींनी भेट दिली. अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यालय उपविजेते तर राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव यांनी एकतर्फी विजय मिळविला. उपस्थित मान्यवरांनी विजयी संघाचे आणि बास्केटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे यांचे कौतुक केले.
यावेळी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्र. सचिव जितेंद्र शिंदे यांनी मंत्री महाजन यांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी राज्य पंच वसीम शेख, दिनेश पाटील, सचिन पाटील, विनय काळे, आशिष पाटील, निखिल झोपे, धनराज चव्हाण, भूषण चौधरी,जावेद शेख आदींचे सहकार्य लाभत आहे.