चाळीसगाव महाविद्यालयात रासेयोचा स्थापना दिवस साजरा

0
49

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) महत्व विषद केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. कारण भविष्यातील खडतर जीवनात रासेयोच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळते, असे नमूद केले. तसेच उप प्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे यांनी रासेयोच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत कश्या पद्धतीने रासेयोची कामगिरी असते, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी व जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी रासेयो हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले.

स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसरात उत्कृष्ट असे सामाजिक प्रबोधन करणारे पथनाट्य किरण निकम, नितीन शेवाळे, चेतन राठोड, संदीप बागुल, वासुदेव सोनवणे, यशवंत मोरे, रोहित देवरे, योगेश महाले, कृष्णा माळी यांनी सादर केले. कार्यक्रमात हर्षल शिंदे, किरण निकम, नितीन शेवाळे, चेतन राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.बोरसे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.बी.बंस्वाल उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पृथ्वी पाटील, रघुनाथ खलाल, अविष्कार जाधव यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.आर.एस.पाटील, सूत्रसंचालन स्वयंसेविका क्रांती माळी आणि गायत्री मांडोळे तर प्रा.दीपक पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here