Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मुंबईतून ‌‘इंडिया‌’ने फुंकले रणसिंग
    मुंबई

    मुंबईतून ‌‘इंडिया‌’ने फुंकले रणसिंग

    SaimatBy SaimatSeptember 1, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

    इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी व्ोगव्ोगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया सुरू करून ती लवकरच पूर्ण केली जाईल, यासह तीन महत्त्वपुर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या बैठकीत १४ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. सर्वच प्रमुख नेत्यांचा मोदी सरकार आणि त्यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत मांडलेल्या तीन ठरावांची माहिती दिली. दरम्यान, इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत १४ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समाव्ोश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे या समन्वय समितीचे सदस्ये असतील.

    इंडियाच्या बैठकीत मांडलेले ठराव
    इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी व्ोगव्ोगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच पूर्ण केली जाईल.
    इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या व्ोगव्ोगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.
    इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‌‘जुडेगा भारत, जीतेगा भारत‌’ या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील.

    मोदीजी १०० रुपये वाढवतात आणि २ रुपये कमी करतात
    मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पंतप्रधानांनी एलपीजीच्या िंकमतीत २०० रुपये कमी केले. परंतु, ते करण्याआधी त्यांनी गॅसची िंकमत अनेक पटींनी वाढवली होती. मोदीजी आधी १०० रुपये वाढवतात आणि मग २ रुपये कमी करतात.वस्तूंच्या िंकमती आधी मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि मग त्यात थोडीशी घट करतात. मोदी सरकारने गोरगरिबांचा खिसा कापला. गरिबांचं शोषण हीच त्यांची रणनीति आहे. परंतु, आता तसं होणार नाही. इंडिया आघाडी ही परिस्थिती बदलेल.

    शरद पवारांचा बंडखोरांना इशारा
    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही आणि जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांनाही योग्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करू. मात्र ते योग्य रस्त्यावर येण्यास तयार नसतील तर त्यांना बाजूला करू,’ असे म्हणत शरद पवार यांनी नामोल्लेख न करता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील बंडखोर गटाला इशारा
    दिला आहे.

    काय म्हणाले उद्धव ठाकरे
    इंडियाच्या तिसऱ्या बैठकीसाठी आलेल्या सगळ्या मातब्बर नेत्यांचं मी स्वागत करतो. आज तिसरी मििंटग झाली. दिवसेंदिवस इंडियाची बळकटी वाढत आहे. आता सत्ताधारी घाबरले आहेत. आमची विरोधकांची एकजूट नाही तर आम्ही सगळे देशप्रेमी एकत्र आलो आहोत. इंडिया हे नाव आम्ही घेतलं आहे. आता देशावर प्रेम न करणारे कोण हे सगळ्यांना माहित आहे. हुकूमशाहीच्या विरोधात, मनमानीच्या विरोधात आणि मित्र परिवारवादाच्या विरोधातही आम्ही लढणार आहोत. कारण सबका साथ सबका विकास हा नारा दिला जातो पण विकास फक्त मित्रांचा केला जातो. ‌‘आता आमचा लढा हुकुमशाही आणि जुमलेबाजीच्या विरोधात आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

    इस्रोने आता मोदींना सूर्यावर पाठवावे : लालुप्रसाद
    आम्ही एकत्र नसल्याची िंकमत देशाला मोजावी लागली. त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. सध्या चांद्रयान आपण चंद्रावर पाठवले आहे. त्यामुळे इस्रोचं कौतुक होतं आहे. आता माझं इस्रोच्या शास्त्रज्ञांना आवाहन आहे की त्यांनी नरेंद्र मोदींना सूर्यावर पाठवावे. म्हणजे मोदींचे जगभरात नाव होईल असा टोलाही लालूप्रसाद यांनी लगावला.

    ६० टक्के लोक एकत्र, भाजपचा पराभव अटळ : राहुल गांधी
    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. ते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. देशातील ६० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत. कॉर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.