प्रशासकीय अधिकाऱ्यांना बांधल्या राख्या

0
13

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेडातर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. राज्य संघटक मेघा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
ग्राहक पंचायत शिंदखेडा शाखेच्या वतीने संघटक नलिनी व्ोताळे व सदस्य छायाताई पवार यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, नगर पंचयात मुख्याधिकारी प्रशांत बिडकर व उपस्थित सदस्यांना राखी बांधली. याव्ोळी जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा, तालुका अध्यक्ष माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, अशोक राखेचा, जितेंद्र मेखे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here