‘नारी शक्ती’ संस्थेतर्फे हास्य फुलविण्याचे काम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी:
संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात ‘नारी शक्ती’ बहुउद्देशीय संस्थेतर्फे रक्षाबंधन सणाच्या पूर्व दिवशी निराधार आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम ‘नारी शक्ती’ तर्फे करण्यात आले.
निराधार वृद्ध आजोबांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. ते आपले उरलेले जीवन कसेतरी कंठत आहेत. अशा आजोबांना एक आशेचा किरण दाखविण्याचे काम ‘नारी शक्ती’ तर्फे केले जात आहे. आपणही कुणाचे रक्षण करू शकतो, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. जळगाव येथील बेघर निवारा केंद्रातील निराधार आजोबांना राखी बांधून त्यांच्या मरगळलेल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम जळगाव येथील ‘नारी शक्ती’ संस्थेतर्फे करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष मनिषा पाटील, सचिव ज्योती राणे, कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, हर्षा गुजराती, नेहा जगताप, संगीता चौधरी, श्रावणी पाटील,योगिता बाविस्कर, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक शीतल काटे उपस्थित होते. सूत्रसंचलन ज्योती राणे तर आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले.