रक्षाबंधननिमित्त ‘राखी विथ खाकी’

0
11

साईमत, नवापूर : प्रतिनिधी
द नवापुर एज्युकेशन सोसायटीत द्वारा संचलित श्रीमती एस. एम. चोखावला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्र सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना रक्षा कवच बांधून त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
नवापूर पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर वारे, उपनिरीक्षक मनोज पाटील, जगदीश सोनवणे, अ.स ई युवराज परदेशी तसेच अन्य पोलीस कर्मचारी आदींना शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने राखी बांधून समाजाप्रती असलेली आपली भावना तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना व्यक्त केली पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी देखील या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना संपूर्ण पोलीस प्रशासनाचे कार्य जबाबदारी व महत्त्व याविषयी माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देखील राष्ट्र सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी बांधवांचे कार्य जवळून अनुभवता आले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन दिवटे यांच्या अभिनव कल्पनेतून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन दिवटे यांच्या अमूल्य मार्गदर्शनानुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here