जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंकज विद्यालयाचा राजवीर कदम प्रथम तर जान्हवी मोतीराळे द्वितीय

0
12

‘झाडे जीवनाचा आधार, असा असावा गणेशोत्सव’ विषयावर अप्रतीम सादरीकरण

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंकज विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी राजवीर गजानन कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच जान्हवी अनिल मोतिराळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ह्या स्पर्धा तु.स.झोपे विद्यालय, भुसावळ यांनी बाबासाहेब के.नारखेडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांनी ‘झाडे जीवनाचा आधार आणि असा असावा गणेशोत्सव’ विषयावर अप्रतीम सादरीकरण केले.विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक डी.एम.जैस्वाल, मनोज अहिरे, प्रियंका पाटील यांचे व पालकांचे यशस्वी मार्गदर्शन लाभले.

भुसावळ येथील आयोजित समारंभात दोघे विद्यार्थी यांना मान्यवर संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन अभिनंदन पालक सोबत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रजनी सावकारे उपस्थित होत्या. यावेळी पी.व्ही.पाटील, प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापक सुनील वानखेडे इतर मान्यवर उपस्थित होते.

‘हसा खेळा व संस्कार पाळा’ वर मार्गदर्शन

यशस्वी विद्यार्थी व स्वरा प्रमोद जाधव, सोज्वळ गढे यांचे विद्यालयात संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांनी कौतुक करून मार्गदर्शक वर्गशिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्याना “ज्ञान तेथे मान” हा कानमंत्र दिला. ‘हसा खेळा व संस्कार पाळा’ असे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील यांच्यासह पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here