पाळधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0
16

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी सर्व मान्यवरांसह प्रा. कर्णसिंग पाटील यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजनासह माल्यार्पण केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या काही स्वयंसेवकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करुन मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे समन्वयक तथा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय कंखरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उत्तम फासे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनील कोळी, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्य प्रा. जयश्री सूर्यवंशी, प्रा. कल्याणी पवार, प्रा. चंद्रशेखर काळकर यांच्यासह इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्‍विनी श्रावणे, सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर तर प्रा. उर्मिला कंखरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here