‘दुनियादारी’ ग्रुपतर्फे राजेंद्र बागुल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

0
30

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर :

तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कुल, प्र. डांगरी येथील ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र तुकाराम बागुल यांची नुकतीच सेवानिवृत्ती झाली. त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात करणखेडे हायस्कुल येथून केली. त्यानंतर काही वर्ष मारवड येथे सेवा केली. त्यानंतर २९ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाचीही जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यानंतर त्यांची न्यू इंग्लिश स्कुल डांगरी येथे सेवानिवृत्ती झाली. त्यानिमित्त मुंदडा नगर -१ व जी. एम. सोनार नगर येथील सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेला उपक्रमशील असा ‘दुनियादारी’ ग्रुपतर्फे त्यांचा घरी जाऊन सपत्नीक शिवराज्याभिषेकची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एस. व्ही.पाटील होते.

सुरुवातीला ग्रुप ॲडमिन सुधाकर पाटील यांनी काही प्रस्ताव मांडले. त्याला सर्वांनुमते अनुमोदन देण्यात आले. याप्रसंगी दयानंद महाजन यांची ग्रुपच्या सह ॲडमिनपदी नियुक्ती झाल्याबद्दल, ग्रुपच्या मीडिया प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अनिल पाटील आणि हिरालाल पाटील यांची व ग्रुपच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.कैलास सोनवणे यांचा डॉ. प्रा. विलास पाटील यांच्या सहचारिणीने पीएचडी मिळविल्याबद्दल विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पिंपळे हायस्कुलच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल विकास शेलकर यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.विलास पाटील, मुकेश पाटील, पंडित सोनगिरे, गोकुळ पाटील, व्ही.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. वीरेंद्र पाटील यांनी गाणे गाऊन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अर्जुन पाटील, आर. बी. पवार, डॉ. घनश्याम पाटील, डॉ. तुषार पाटील, जिजाबराव माळी, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुधाकर पाटील, विजय माळी, दीपक पाटील, गजेंद्र माळी, शंकर बोरसे, दयानंद महाजन, रवींद्र सनेर , व्ही. आर.पाटील, अनिल पाटील, समाधान खैरनार, विनोद पाटील, संजय बागुल, शामकांत पाटील, समाधान पाटील, पंडित सोनगीरे, गणेश पाटील, मुकेश पाटील, पी.पी.निकम, एकनाथ निकुंभ, महेश बोरसे, राजेंद्र शिंपी, विठ्ठल पाटील, प्रवीण महाजन, कैलास सोनवणे, विकास शेलकर, गोकुळ पाटील, विजय पाटील, मुरलीधर चव्हाण, हिरालाल पाटील, गुलाब शिरसाठ, विलास पाटील, विजेंद्र पाटील, महेंद्र पाटील, संदीप पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. हिरालाल माळी तर आभार सत्कारमूर्ती राजेंद्र बागुल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here