Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»राजस्थानी विप्र संघटनेकडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
    भुसावळ

    राजस्थानी विप्र संघटनेकडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील राजस्थानी विप्र संघटनेतर्फे १८ ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत पंचरंगी कार्यक्रम घेण्यात येत आहे. अशातच भुसावळ मध्यवर्ती भागातील सराफ बाजार, भजीया गल्ली, जाम मोहल्ला परिसरात गोसेवक रोहित महाले आणि त्यांचे सहकारी यांचे श्रीरामलला स्थापना निर्मित अनेकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बबीता विनोद शर्मा होत्या.

    गोसेवक गाईला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात. त्यांची कत्तल थांबविण्यासाठी अथक प्रयत्न करतात. देशभक्तीची जाण ठेवतात. गोमाता म्हणजे भारताची अस्मिता वाचविण्याचे कार्य श्री.महाले करतात. तसेच त्यांचे सहकारी मित्र भुसावळ परिसरातील अनाथ, गोरगरीब, आजारी, जखमी व्यक्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करून तेथील डॉक्टरांच्या भेटी घेऊन त्यांना योग्य ते औषधोपचार मिळवून देतात. म्हणून श्री. महाले यांना गौरवास्पद अनाथांचे वाली सच्चे गोसेवक म्हणून संबोधले जाते.

    गौरक्षक गुरुवर्य मिथुन बारसे, गब्बर चावरीया, जीतु जाट यांच्यामुळे तालमीत गोमाता सेवेचे तसेच लोकांना वाचविण्याचे धडे गिरविले, असे मनोगत मांडले. अशा गोसेवक श्री.महाले यांचा सत्कार राजस्थानी विप्र संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा तसेच बबीता शर्मा यांनी केला. याप्रसंगी गोशाळेमध्ये जाऊन गाईला चारा देण्यात आला.

    सत्कारमूर्तीमध्ये समाजसेवक गब्बर चावरीया, गोरक्षक जितु पवार जाट, रोहित महाले, सोनू टाक, बबलू धायडे, गणेश चौधरी, विशाल गेंगट, दीपक सुरडकर, किरण पाटील (सर्पमित्र), दिनेश अंडायेंगे, रोहन धोसेले, तुषार धोसेले, कुलदीप लोडते, मयूर सावकारे, सचिन बडगे, राहुल बाविस्कर, अर्जुन गेंगट यांच्यासह अन्य गोरक्षकांचा समावेश होता.

    याप्रसंगी वसंत गाडगे, प्रशांत शर्मा, चेतन शर्मा, यश अग्रवाल, कृष्णा शर्मा, दीपक शर्मा, राम अहिरे, नवीन शर्मा, नितीन शर्मा, कैलाश उपाध्याय, पंडित विनोद जोशी, सत्यनारायण शर्मा, स्वप्निल साळवे, सिद्धेश शर्मा, कार्तिक शर्मा, सुनील ठाकूर, अग्रवाल नवयुग मंडळाचे अध्यक्ष गोकुळ अग्रवाल, महिलांमध्ये उषा शर्मा, सोनल शर्मा, पूजा शर्मा, पिंकी शर्मा, पूजा चौरसिया उपस्थित होते. सूत्रसंचालन जयप्रकाश शुक्ला यांनी केले. तसेच श्रीमती देशपांडे यांनी स्वागत गीत सादर केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.