पालक-शिक्षक सभेला पालकांचा मिळाला प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक, डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी, १२ जुलै रोजी पालक-शिक्षक सभा घेण्यात आली. सभेत कॉल इंडिया लिमिटेडचे सामुदायिक विकास अधिकारी डॉ. आशिष सूर्यवंशी यांच्याकडून विद्यालयास ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमासाठी कचराकुंडी भेट देण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी महापौर जयश्रीताई महाजन होत्या.
सभेला पालक प्रतिनिधी म्हणून रामकृष्ण जंगले, मनीषा पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सभेत मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी पालकांशी चर्चा केली. तसेच केतन बऱ्हाटे यांनी पालकांना शिष्यवृत्तीविषयी माहिती दिली. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानचंद बऱ्हाटे तर संदीप खंडारे यांनी आभार मानले.