साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कामकाजासाठी दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सीमार्फत बाह्यस्त्रोत कर्मचारी मदतनीस म्हणून भरती केले आहे. कामगारांनी चाळीसगाव महावितरण कंपनीचे १८ तास काम करूनही ऑक्टोबर २०२२ चा पगार कर्मचाऱ्यांना ८ महिने होऊनही पगार व सुरक्षा साधने पुरविले गेले नाही. त्यामुळे २० जुलै २०२३ रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर रयत सेना आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्यावतीने ५ तास धरणे आंदोलन केले होते. आंदोलनप्रसंगी चाळीसगावचे कार्यकारी अभियंता आणि दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सी यांनी ऑक्टोबर २०२२चा पगार १० दिवसात देण्याचे रयत सेनेला आश्वासन देवूनही आजतागायत पगार न झाल्याने पुन्हा रयत सेना व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनाची दखल घेऊन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर २०२२ चा पगार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल टकले यांना कार्यकारी अभियंता शेंडगे आणि दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सीचे सुमित चौधरी यांनी येत्या ४ दिवसात पगार देण्याचे मान्य केल्यानंतर पोलीस प्रशासनाने रयत सेनेचे संस्थापक गणेश पवार व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना सर्व मागण्या ४ दिवसात पूर्ण केल्या जातील. त्यामुळे आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन केल्यानंतर रयत सेनेने आंदोलन स्थगित केले. रयत सेनेने केलेल्या आंदोलनामुळे कामगारांना न्याय मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी रयत सेनेचे आभार व्यक्त केले.
यांचा होता आंदोलनात सहभाग
आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गोकुळ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष संजय हिरेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोसले, तेली युवा मंचचे अनिल ठाकरे, शहराध्यक्ष छोटू अहिरे, अनिल फडांगरे, भूषण पाटील तसेच अमोल पगारे, प्रसाद गवळी, अभिजीत शिंदे, कुणाल पाटील, प्रदीप आमले, आकाश पाटील, अविनाश पाटील, राकेश पाटील, विनोद पाटील, योगेश पाटील, केतन झाल्टे, प्रवीण झोडगे, शुभम चौधरी, शुभम नवले, भूषण पाटील, गुलाबसिंग राजपूत, महेंद्र राजपूत, अमोल खैरे, किशोर पाटील, रवी चव्हाण यांच्यासह १०४ बाह्यस्त्रोत कर्मचारी सहभागी झाले होते.